in

१९ सप्टेंबरपासून होणार आयपीएलचे उर्वरित सामने

आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित ३१ सामने युएई मध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर पर्यंत खेळविले जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे.करोना प्रकोप वाढल्यामुळे भारतात आयपीएल सिझन १४ चे सामने मध्येच स्थगित केले गेले होते. ४ मे पासून हे सामने थांबविले गेले होते आणि ते परत होणार की नाही याची कोणतीच खात्री दिली जात नव्हती. आयपीएलचे उरलेले सामने टी २० वर्ल्ड कप अगोदर व्हावेत यासाठी बीसीसीआय कडून प्रयत्न सुरु होते.

भारतातून करोना अद्यापी हटलेला नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने ऑक्टोबर पूर्वी भारतात घेणे थोडे अडचणीचे ठरले होते. त्यातच टी २० वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे ते करोना मुळे अन्यत्र जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. बीसीसीआय आयपीएल प्रमाणे टी २० वर्ल्ड कप सुद्धा युएई, ओमान मध्ये आयोजित करण्याचा विचार करत असल्याचेही वृत्त आहे. आपली स्थिती स्पष्ट करण्यासाठी बीसीसीआयने आयसीसी कडे २८ जून पर्यंत मुदत मागितली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संभाजीराजेंनी बोलवली समन्वयकांची बैठक

महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया,पोटातून ५ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश