in

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्‍हयाच्‍या दक्षिण भागात कोसळत असलेल्‍या पावसाने अंबा नदीचे पात्र ओसंडून वहात असून नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्‍यामुळे पाली येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. दुसरीकडे जांभुळपाडा येथील पुलावरदेखील पाणी आल्‍याने खोपोली ते वाकण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्‍प झाली आहे.

पाली येथे रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी वाहनांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. कामावर गेलेले चाकरमानी तसेच लावणीच्‍या कामासाठी गेलेले शेतकरी अडकून पडले आहेत. या परिस्थितीत खोपोली ते वाकण मार्गावरील वाहूतक ठप्‍प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्‍हणून पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. (Raigad rain Update)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदाही बैलपोळा सणावर संक्रांत

पोलीस शिपायाच्या प्रसंगावधाने वाचले प्राण