in

कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू

हरिद्वार येथे संपन्न झालेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी झाली. वर्धा जिल्ह्यातूनही काही भाविक हरिद्वार येथे गेले आहेत. आता ही मंडळी मेळा आटोपून परतीच्या वाटेवर आहेत. त्यांची निश्चित संख्या पुढे आलेली नाही. जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता नव्याने भर पडू नये म्हणून सर्व ती काळजी शासनातर्फे घेतली जात आहे. भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वत:च कोरोना तपासणी करावी, तसेच गृह विलगीकरणात राहून नियमांचे तंतोतंत पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या, सध्या अशा भाविकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्याबाबत माहिती घेतली जात आहे. उत्तराखंडला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरात वर्धेतील काही वाहून गेले होते. तर काही सुखरूप परतले होते. त्या अनुषंगाने माहिती काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Assembly Election | निवडणूक आयोगाची आज सर्वपक्षीय बैठक

Petrol Rate today | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर