in

50MP कॅमेरावाला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

भारतात २२ जुलै रोजी OnePlus कंपनीचा Nord 2 हा जबरदस्त कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे.स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला असून मागील वर्षी लाँच केलेल्या OnePlus Nord फोनचा हा अपग्रेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनमध्ये काय आहे खास? :

  • OnePlus Nord 2 ला मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला असून मीडियाटेक प्रोसेसरसह येणारा हा पहिला वनप्लस फोन असणार आहे.
  • वनप्लसने आपल्या oneplus.nord इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला आहे.
  • यामध्ये आगामी वनप्लस नॉर्ड 2 ची मागील डिझाइन पाहू शकता. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप फोनला देण्यात आला आहे.
  • फ्लॅशच्या पुढे दोन मोठे सेन्सर आणि एक छोटा सेन्सर आहे. वनप्लस नॉर्ड 2 च्या डिझाईन संदर्भात सध्या अशीच माहिती समोर आली आहे. हा फोन MediaTek Dimensity 1200-AI प्रोसेसरसह येणार असून यात 90Hz रिफ्रेश रेट, OxygenOS 11 आणि 50MP प्रायमरी कॅमेर्‍यासह 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्लेदेखील मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

Rain Update : मिरा भाईंदर, वसई, विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते पाण्याखाली