in

भिवंडीत बाप्पाच्या सजावटीतून साकारले केदारनाथचे मंदिर

गणपती बाप्पाच्या अगमनानाने सर्वाकडे आनंद उत्साहाचं वातावरण तयार होते. कोरोना काळात सर्वच देवस्थाने बंद असल्याने भिवंडी बळवे कुटूंबाने चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिराचे आरास करत केदारनाथ मंदिराची हुबेहूब मंदिर साकारले आहे. या सजावटीसाठी बळवे कुटुंबीयांनी गुगल व युट्युबची मदत घेतली.
भिवंडीत बाप्पाच्या सजावटीतून केदारनाथचे दर्शनगुगल व युट्युबची मदत -भिवंडी शहरातील काप आळी परिसरात अंकुश गजानन बळवे हे कुटूंबासह राहतात. त्यांच्या घरी ६८ वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये गणरायाची १० दिवस भक्तिभावाने पूजाअर्चाना करतात. केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती घरीच साकारली आहे. विशेष म्हणजे गुगल आणि युट्युबवर मंदिराची संपूर्ण रचना पाहून तब्बल १ महिन्यात मंदिराची प्रतिकृती साकारली. शिवाय मंदिराची सजावट पेपर, पुठ्ठा आणि कापसाचा वापर करून इकोफ्रेंडली सजावट केल्याचे सांगण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pornography Case: शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब म्हणाली “राज काय करतो…”

गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग; मंत्रिमंडळातील २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी