in ,

ठाकरे सरकार लबाड नाही तर महावसुली सरकार आहे; फडणवीसांचा हल्लाबोल

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे.

या ठाकरे सरकारने वीज कापणार नाही असं आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलं. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

2 मे रोजी देशाला धक्का बसेल

भगवान बसवेश्वरांच्या स्मारकासाठी या सरकारने अर्थ संकल्पात काहीही तरतूद केली नाही. आम्ही या स्मारकासाठी तरतूद केली होती. त्यांना विचारल्यावर फक्त एकही पैसा कमी पडू देणार नाही, असं हे सरकार सांगत असतं, असं सांगतानाच येत्या 2 मे रोजी पंढरपूरचा निकाल लागेल. त्याच दिवशी बंगाल आणि आसामचाही निकाल लागणार आहे. त्यावेळी देशामध्ये सर्वांनाच धक्का बसेल, असा दावाही त्यांनी केला

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीश ‘वर्क फ्रॉम होम’

Weather Report | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ भागात पावसाचा अंदाज