in

कसारा घाटात दरड कोसळली, या ट्रेन्स रद्द

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. परिणामी रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

चिपळूणसह खेर्डी जलमय; २००५ पेक्षा भयंकर परिस्थिती