in

ट्रक रिव्हर्स घेताना घरात घुसला, सुदैवाने जीवितहानी नाही; भीम नगरातील घटना

अकोला | जुने शहरातील भीम नगर येथील एका गल्लीत घर काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी रेती एक ट्रक घेऊन आला. हा ट्रक गल्लीत जाताच त्याने रिव्हर्स घेतला. परंतु, रिव्हर्स घेताना चालकाला अंदाज न आल्याने हा ट्रक दादाराव नवले यांच्या घरातच घुसला. त्यामुळे त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालक अजय तायडे याला पकडून ठेवले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुलावर गळफास घेऊन संपवले आयुष्य

नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक