in

‘नाटकांसाठी रस्त्यावर उतरून नाट्यआंदोलन करायची वेळ आणू नका’ रंगकर्मींचा इशारा…

#रंगभूमी सुरु करा सध्या सोशल मिडिया वर ट्रेंड

राज्यातील निर्बंधामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृहावर पडलेला पडदा अजूनही कायम आहे, मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांचे उत्पन्नाचे प्रश्न कायम आहेत, या पार्श्वभूमीवर किमान ५० टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह आणि सिनेमागृह खुली व्हावीत, अशी मागणी कलाक्षेत्रातून होत आहे, सरकार अजूनही मनोरंजन क्षेत्राकडे फारसं लक्ष्य देत नसल्याने #रंगभूमी सुरु करा असा ट्रेंड फेसबुक आणि ट्विटरवर cmo ला tag करुन मोहीम सुरु आहे.

बसमधील आणि बाजारातील गर्दीच्या तुलनेत नाट्यगृहमधील ५० टक्के आसन क्षमतेमुळेच फक्त कोरोना पसरतो का?असा प्रश्न करत कलाकारांनी राजकारण्याच्या निषेधाचे पोस्ट सध्या व्हायरल केले. अनेक कलाकारांनी निषेध फलकाचे फोटो सोशल मिडिया वर सुरु केले.

नुकताच नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात देवेंद्र फडणवीस आणि छगन भूजबळ यांच्या हजेरीत एक कार्यक्रम पार पडला होता, प्रेक्षागृहात लोक ही भरपूर जमली होती, सोशल डिस्टंसिंग चे तीन तेरा वाजले होते,नाट्यगृहात सरकारी कार्यक्रमाना परवानगी मिळते मग नाटकांना का नाही? असा सवाल करत रंगकर्मींनी संताप व्यक्त केला होता.

जवळजवळ दीड वर्षपासून नाट्यगृह बंद असल्याने कलाकार, तंत्रज्ञ, नाट्यगृह कर्मचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत, सरकारने हे ध्यानात घेऊन किमान ५० टक्के प्रेक्षकांसाठी छोट्या स्वरूपातील नाट्यप्रयोग करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत असून ‘रस्त्यावर सुद्धा नाटक उतरत, आणि थेट माणसांच्या काळजात शिरतं ह्यांची कल्पना असावी, नाटकासाठी रस्त्यावर उतरून नाट्यआंदोलन करायची वेळ आणू नका’ असा इशारा सरकारला दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

china Flood | चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर

उरमोडी धरणातून 2196 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू