in

‘आरोपांमध्ये तथ्य नाही, देशमुखांचा राजीनामा नाही’

New Delhi: Letter Bomb: Pawar says matter serious, CM can take action.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी परमबीर सिंह आरोपासाठी १ महिना का थांबले ? असा सवाल करत पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी शरद पवारांनी वारंवार देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सदर करून परमबीर सिंह यांनी नमूद केलेल्या वेळेत देशमुख रुग्णालयात होते अशी माहिती माध्यमांना दिली. त्याच प्रमाणे वाझे -देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दावाच खोटा तर चौकशी कसली ? असा सवाल करत हे सर्व लक्ष विचलित करण्यासाठी केले जात आहे असे देखील ते म्हणाले. तसेच ATS ने योग्य दिशेने तपास केला असून आरोपींना पकडल्याने मला आनंदच झाला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

हे सर्व प्रकरण स्फोटकांचेच असून विरोधक दिशाभूल करत आहेत असा आरोप देखील त्यांनी यावेळी लावला. या सर्व प्रकरणी सरकार अस्थिर नाही, देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी निर्थक असून त्यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतली असे देखील ते यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणारे अनिल देशमुख हे नेमके कोण?, पवारांच्या दाव्यावर फडणवीसांचा सवाल

‘पत्रकार परिषद घेतली पण …’ वादावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया