मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, राज्यातील भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपच्यावतीने डोंबीवलीत इंदिरा गांधी चौकात राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आलीत. यावेळी गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. परमवीर सिंग या व्यक्तीच्या नव्हे तर ते ज्या पदावर आहेत त्या पदाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, त्याना सहकार्य आम्ही करणार अशी भूमिका भाजपा नेत्यांनी बोलून दाखवली.
Comments
Loading…