मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा पक्ष आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली आहे.
हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपाने एक कॅप्शनही लिहली आहे. पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे.या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली दाखवण्यात आली आहे. अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे दिसत आहे.
Comments
Loading…