मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने संमती दिली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते जयंत पाटील की दिलीप वळसे पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणाकडे जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
अनिल देशमुख यांची उचलबांगडी होण्यासाठी सर्वात मोठं कारण म्हणजे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात परमबीर सिंगांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या गंभीर आरोपामुळे देशमुखांचा पाय खोलात आहे.
गृहखात्याची जबाबदारी आता जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. कारण मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपद संकटात आले होते. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे दिसते.
Comments
Loading…