in

”चोराच्या उलट्या बोंबा” ; जयंत पाटील यांचा फडणविसांना टोला

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल दर कपातीवर काहीच घोषणा करण्यात आली नाही. यावर पेट्रोल-डीझेलमध्ये राज्य सरकारचा कर जास्त असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतं फडणविसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, पेट्रोल-डीझेल दर कपातीची पूर्णपणे जबाबदारी नरेंद्र मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्याचे कर कमी करायला लावायचे, हा पूर्णपणे राज्यांवर अन्यायकारक आहे. केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, तर राज्यांच्या महसूलामध्येही घट होईल. त्यामुळे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही, असे ते म्हणाले. आम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून द्या म्हणजे राज्यातील जनतेवरील पेट्रोल-डिझेलचा बोझा कमी होईल,” असा सल्लाही पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“रोज पेट्रोल-डिझेलचे फलक घेऊन येणारे सत्तापक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने २७ रुपयांपैकी एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल १० रुपये महाग आहे कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा अर्थसंकल्पात कोणत्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मिळणार निधी…

कुस्तीपटू विनेश फोगाटची ‘सुवर्ण’कमाई