in

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या वस्तू… !

नाशिक नंतर आता कोल्हापूरच्या शिरोळमध्ये देखील दोन लस घेतलेल्या 67 वर्षीय नागरिकाला चमचे, प्लेटा, नाणे अशा वस्तू चुंबकाला चिकटल्या प्रमाणे शरीराला चिकटत असल्याचा अद्भुत प्रकार सायंकाळी समोर आला. शिरोळच्या सम्राट नगर परिसरात राहणाऱ्या माजी सैनिक सहदेव गोविंद कुंभार यांच्या शरीराला स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या धातूच्या लहान सहान वस्तु चिकटू लागल्याने परिसरातील नागरीक आवाक झाले आहेत.

कुंभार यांच्या शरीरावर कशा पद्धतीने वस्तू चिकटून राहतात हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या विभागातून नागरिक गर्दीने येत आहेत. कुंभार यांनी 13 मे रोजी कोविशिल्डचा डोस घेतला होता. पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये 47 दिवसांचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूवारी नाशिक येथील प्रकाराची बातमी टिव्हीवर गहात असताना त्यांनी नातवा करवी प्रयोगादाखल आपल्या शरीराला चमचे प्लेट चिकटतात काय याची खात्री केली तर प्रत्यक्षात अंगाला लावेल त्या वस्तू चिकटू लागल्या. सुरुवातीला या प्रकारावर त्यांचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता पण वस्तू चिकटून राहिल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आणि त्यांनी प्रभागातील नगरसेवक सुरज कांबळे यांना बोलावून घेऊन वस्तुस्थिती दाखवली. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेल्या काही नागरिकांच्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon 2021 | रायगडात पावसाचा जोर नाही मात्र रेड अलर्ट कायम

मोबाईल वाचवताना रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू