in

पुष्पक एक्सप्रेस प्रकरणात तीसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या


विकास काजळे

पुष्पक एक्सप्रेस बलात्कार आणि दरोडा प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी इगतपूरी परिसरातून 23 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिसांची पथक आरोपींच्या शोध घेत आहे. अटक केलेले आरोपी कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

इगतपुरी ते कसारा दरम्यान धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळच्या  सुमारास  घडली आहे. कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपींना प्रवशांनी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

काँग्रेस आक्रमक : केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सोमवारी देशभरात ‘मौन व्रत’