in

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

भारतात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतातून दररोज परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप प्राप्त केल्यानंतर जवळपासच्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कॅनडा सरकारने 21 ऑगस्टपर्यंत भारतातुन येणाऱ्या सर्व विमानांवर पुर्णपणे बंदी घातली आहे. एनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.

त्यातच आता भारतातुन कॅनडामध्ये जाणाऱ्या सर्व विमानांवर कॅनडा सरकारने कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच यामुळे आता भारतातुन कॅनडामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांवर निर्बंधांची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. कॅनडा सरकारने आज निर्णय घेऊन या संदर्भात माहिती जाहीर केली आहे. भारतातुन कॅनडाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पंजाबमधील लोक मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये स्थायिक असल्याचं दिसुन येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Raj Kundra arrest : राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोल

Share Market Updates | शेअर बाजार घसरला