in

“छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ही लोकशाही नाही”

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेशी संवाद साधला. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जाती-जातीत तेढ निर्माण होताना दिसतोय. हे महाराष्ट्रासाठी घातक असुन असे राज्य शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य नाही, असं देखील त्यांनी नमूद केलं.

अनेकजण शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात. पन त्यांच्या विचारांवर मात्र कोण चालत नाही.शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांची पायमल्ली करतात उदयनराजे भोसले म्हंटले.

नक्की काय म्हणाले उदयनराजे..

“माझ मन अत्यंत दु:खी झाले आहे आज आपण शिवाजी महाराजांच नाव घेतो. मग तो कोणताही पक्ष असो. पण जेव्हा त्यांचे विचार आचरणात आणण्याची वेळ येते, तेव्हा तसं काही पाहायला मिळत नाही. व्यक्तीकेंद्री विचार आचरणात आणले जातात. समाजांमध्ये तेढ का निर्माण झाली?”, असं देखील साताऱ्यात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ही लोकशाही नाही”

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जर आंमलात आणायचे नसतील तर, त्यांच्या नावाची पुस्तके वाचुन फायदा काय? असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी मांडला.“छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ही लोकशाही नाही. महाराजांनविषयीच्या अनेक कादंबऱ्या ,पुस्तके मी वाचली आहेत. पन फक्त वाचुन करायच काय? जर त्यांचे विचार आंमलात येणारच नसतील तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे माझे मित्र आहेत. पन त्यांच्यात मला कोठोतरी दुरावा झालेला दिसतो.आपले पुर्वज जसे राहत होते तसेच आपण राहीलो पाहीजे. हिच खरी शिवरायांच्या विचारांची लोकशाही आहे. असं ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shivrajyabhishek Din 2021 | भारतीय इतिहासाचं सुवर्णपान ‘शिवराज्याभिषेक’

मुख्यमंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक सुरू