in

‘हेच का तुमचं हिंदुत्व ?’ मनसेच्या अविनाश जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जमावबंदीचे आदेश झुंगारून गर्दी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.मलंगगडावर आरती करण्यासाठी ती जाणार होते. या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या अटकेनंतर अविनाश जाधव आक्रमक झाले असून मंगळवारी मलंगगडावर झालेल्या हाणामारीचा उल्लेख करत, ‘हेच तुमचं हिंदुत्व का ? असा संतप्त सवाल शिवसेना केला आहे.

शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याआधी मंगळवारी मलंगगडावर दोन गटामध्ये मंगळवारी हाणामारी झाली होती. नेमके हे अज्ञात हल्लेखोर कोण होते याबाबत अस्पष्टता आहे. मात्र समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर त्यांनी टविट करत, काल मलंगगडावर पौर्णिमा महाआरतीसाठी धर्मांध मुस्लिम लोकांकडून विरोध करण्यात आला. आज मलंगगडावर जात असतांना पोलिसांनी मला अटक केली. सरकार दंगलखोरांवर काय कारवाई करणार? हेच तुमचं हिंदुत्व का? असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेवर केला. त्याचबरोबर येत्या 27 एप्रिल 2021 ला चैत्र पौर्णिमेला मलंगडावर महाआरती करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण : सर्व अधिकारी निर्दोष

परमबीर सिंग याचिका सुनावणी : “तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात” – हायकोर्ट