in

जळगाव मनपातील ३ भाजपा बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

जळगाव महानगरपालिकेतील ३ बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली असून माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भाऊ यांच्या उपस्थितीत भाजपचे बंडखोर नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी व हसीना बी. शेख यांनी भाजपत घरवापसी केली आहे.

भाजपची एक हाती सत्ता होती. मात्र, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे २७ नगरसेवक आपल्या गळाला लावून भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवला होता.

दरम्यान, २७ नगरसेवकांपैकी ३ बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केल्याने बंडखोर गटाला मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना प्रभाग समिती निवडणुकीत व्हीप बजावले होते. दरम्यान पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याने २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे त्यांनी शुक्रवारी ८ ऑक्टोंबर रोजी २७ नगरसेवकांना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी दिला आहे. या याचिकेवर सुनावणी अद्याप बाकी असताना ३ बंडखोर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने जळगाव महानगपालिकेत राजकीय खलबते पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात घातला की कॉंट्रक्टर्सच्या घशात? नितेश राणेंचं महापौरांना पत्र

शिर्डी विमानसेवा आज पासून सुरू