in

वीजेची मागणी कमी झाल्याने परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद

परळी येथील औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचातून ७५० मेगावँट विज निर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांना रोजगार मिळतो. मात्र लॉकडाऊन आणि विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून औष्णिक विद्युत महानिर्मिती केंद्राचे सर्व संच बंद झाले आहेत.

या महानिर्मिती केंद्रातून ११०० मेगावँट विजनिर्मिती केली जात होती. यातील दोन विद्युत निर्मिती संचाची मुदत संपल्याने ते भंगारात काढण्यात आले. उर्वरित तीन संच हे २५० मेगावँटचे असल्याने तीन संचातून ७५० मेगावँट विद्युत निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रास कधी पाणी कमी पडते. कधी, कोळसा नसतो. दोन्ही उपलब्ध असेल तर या संचातून निर्माण होणारी विज महाग पडते म्हणून विद्युत निर्मिती बंद केली जाते. सध्या लाँकडाऊनमुळे विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील तीनही संच सध्या बंद आहेत. महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे सर्व संच सुरू आहेत. येथील संचच का बंद असा प्रश्न बेरोजगार युवक करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

1 जूनपासून सर्व निर्बंध शिथील करणार नाही

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका