in

धक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत

प्रतिनिधी – भूपेश बारंगे

वर्ध्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील राहटी शिवारातील जंगल बिट क्र 53 मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमावर तीन वाघांने हल्ला केला असून या हल्ल्यात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. नांदोरा येथील मृतक मुकुंद हिरामण ढोके वय 58 हा कुटुंबातील पत्नी, मुलगा,पुतण्या ,भावाच्या पत्नी सह जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडताना मुकुंद ढोके हे परिवाराच्या काही अंतरावर तेंदूपत्ता तोडायला गेले असता परत आले नाही.

वडील परत आले नसल्याने सर्वजण त्यांना आवाज देत होते मात्र दोन तास लोटूनही परत आले नाही. वडील परत येत बघायला गेले असता वाघीण व दोन बछडे त्यांना ओढत नेट असताना दिसले. त्यामुळे घाबरल्याने सर्वजण मागे सरले व मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता तीन वाघांना हाकलून लावले. मात्र तोपर्यंत मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झाला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

cabinet meeting : चंद्रपुरातील दारूबंदी उठवली… जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळालं ‘हे’ सरप्राईज