in

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये “टायटन’ सर्वोत्तम

नुकतीच 74 वा कान्स फिल्म फेस्टिव्हलची शनिवारी सांगता झाली. अखेरच्या दिवशी फेस्टिव्हलमधील सर्वोत्तम सिनेमांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात ‘टायटन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवडले गेले. या सिनेमाच्या डायरेक्‍टर ज्युलिया डुकार्नो यांना कान्स फेस्टिव्हलचा सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पाल्म डी ओर या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अमेरिकेतील कालबे लॅन्ड्री जान्स यांना मिळाला, तर नॉर्वेच्या रोनेट रिन्सवे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविले गेले. गेल्या वर्षी कान्स फिलम फेस्टिव्हल करोनाच्या साथीमुळे रद्द केला गेला होता. यापूर्वी ‘पॅरासाइट’ या सिनेमाला 2019 सालचा पाल्म डी ओर पुरस्कार मिळाला होता.

हा सिनेमा ऑस्करपर्यंत गेला होता. तसेच या सिनेमाला वर्षाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणूनही निवडले गेले होते. यावर्षी लेओस कॅरॅक्‍स, वेस अँडरसन, जुलिया डुकार्नो, पॉल वेरहोवेन, असगर फहादी, सेन बेकर यांच्या नवीन सिनेमांचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. या फेस्टिव्हलमध्ये पायल कापटिया दिग्दर्शित ‘अ नाईट विथ नोईंग नथिंग’ या डॉक्‍युमेंटरीला गोल्डन आय पुरस्कार मिळाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Video ; पिंजाळ व तानसा नद्यांनी सोडली पातळी

Gold Price Today | चार दिवसांनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, तर चांदीच्या दरात घट