in ,

राज्यात आज 9 हजार रुग्ण कोरोनामुक्त

Pneumonia coronavirus

राज्यात आज 9 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर 8 हजार 744 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारच्या तुलनेत आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा आजची आकडेवारी हि किंचितशी खालावली आहे. मात्र आजची नवीन कोरोनाबाधितांची संख्या हि राज्यशासन व आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

राज्यात आज 8 हजार 744 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 28 हजार 471 वर पोहोचली आहे. तसेच 9 हजार 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 112 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 93.21 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 97 हजार 637 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 22 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.36 टक्के आहे. मृतांच्या आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Budget; राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान नेमक आहे काय?

नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन; ‘या’ गोष्टींवर बंदी