in

बदलापुरात मुसळधार पाऊस; रेल्वे रूळ पाण्याखाली

गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता. गुरुवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. परिणामी उल्हास नदीच्या जवळ असलेले रेल्वेरुळही पाण्याखाली गेले होते.

उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून गुरुवारी पहाटे या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. १७.५० मीटर ही उल्हास नदीची धोक्याची पातळी असून गुरुवारी पहाटे उल्हास नदीने १८ मीटर पाण्याची पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकाठच्या संकुलामध्ये तळ मजले पाण्याखाली आले होते. उल्हास नदीच्या किनार्‍यावर असलेल्या रमेशवाडी हेंद्रे पाडा आणि वालिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गृह संकुलांमध्ये आले होते. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बदलापूर- वांगणी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उल्हास नदीच्या किनार्‍यावर असलेले रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले होते त्यामुळे रेल्वेवर देखील त्याचा परिणाम झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापुरात पावसाचं थैमान; NDRFची टीम रवाना

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून अभिनेता ‘उमेश कामत’चा फोटो!