in

चिपी विमानतळ लवकर कार्यान्वित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत DGCA ने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

या बैठकीत राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गत वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरू केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न

दीपाली चव्हाण प्रकरणानंतर ‘टास्क फोर्सची’ स्थापना