in

पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा उल्लेख ‘मराठा आक्रमक’

गोव्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध अशा अगौडा किल्ल्यातील तुरूंगाविषयी पर्यटन विभागाने ट्वीट केलं होतं. या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देताना ट्वीटमध्ये पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील मराठा मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमक असा करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी भाजपा सरकारला फैलावर घेतलं. पर्यटन विभागाकडून करण्यात आलेल्या ट्वीटवर संताप व्यक्त करण्यात आला. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावरून सुनावल्यानंतर पर्यटन विभागाने ट्वीट डिलीट करत माफी मागितली आहे.

काय होतं ट्वीटमध्ये?

“अगौडा तुरुंग अप्रतिम अगौडा किल्ल्याच्याच भाग आहे. हा किल्ला १६६२ मध्ये निर्माण करण्यात आला होता. डच आणि मराठा आक्रमकांच्या विरोधात पोर्तुगीजांचं संरक्षण करणारा हा किल्ला आहे. हा दोन भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे,” असं ट्वीटमध्ये म्हणण्यात आलं होतं. पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबर मराठा सैनिकांचाही आक्रमक असा उल्लेख केल्यानंतर टीका सुरू झाली.

“हा मोदींचा आधुनिक इतिहास आहे का?”

पर्यटन विभागाच्या वादग्रस्त ट्वीटवरून काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारला सुनावलं. दिगंबर कामत यांनी ट्वीट करत हा मोदींचा आधुनिक इतिहास आहे का असा सवाल केला आहे. “गोव्यातील बेजबाबदार सरकारने महान योद्ध्यांचा उल्लेख आक्रमक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा शूरांचा अपमान केला आहे. हा मोदींची (MODIfied) आधुनिक इतिहास आहे का?,” असा सवाल कामत यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#UddhavThackeray हॅशटॅग टि्वटरवर ट्रेण्ड का होतोय?

‘फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्र्यांनी वेळ वाया घालवला’