in

पुणे-नाशिक महामार्गावर हरभरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात

पुणे-नाशिक महामार्गाच्या डोळासने येथे ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पुणे-नाशिक या महामार्गावर गुजारात राज्यातुन हरभरा घेऊन येत असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने संगमनेरच्या डोळासने येथील पुणे-नाशिक महामार्गा वरील पुलावरून कोसळत पलटी झाला आहे.

या अपघातात सुदैवाने ट्रकचा चालक व साथीदार थोडक्यात बचावले आहे.घटनेची माहिती मिळातच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांची टिम घटनास्थळी पोहचली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू होते.

वाहन चालकांनी पुणे-नाशिक महामार्गावर वाहने चालवत असताना वेग मर्यादेचे पालन करा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोझॅक पोट्रेट साकारत चिमुकल्याने दिल्या मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रमी शुभेच्छा !

शहापूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना पालकमंत्र्यांची भेट; अल्याणी गावातील शंभर घरांचे पुनर्वसन करणार