in

“जितेंद्र आव्हाड आणि सर्वसामान्यांना वेगळा निर्णय का?”

राज्य सरकारने अद्याप मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाहीय. असं असतानाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आरती केली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे आव्हाडांव्यतिरिक्त उपस्थित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या पोलीस तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांचं नाव मात्र नाहीय. त्यामुळे आता टीकेची झोड उठत आहे.

भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी नाराजी व्यक्त केली असून ठाकरे सरकारातील मंत्र्यांना वेगळा न्याय असतो का असा प्रश्न केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अद्यापही सर्व निर्बंध काढून टाकलेले नाहीत विशेषतः धार्मिक स्थळे पूर्णतः बंद आहे मठ मंदिरे उघडे द्यावी यासाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. त्यावर अर्थकारण असलेल्या घटकांची उपासमार होत आहे.

मात्र, असे असतानाही ठाकरे सरकार मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही. मात्र दुसरीकडे गेल्या रविवारी नाशिक मध्ये आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आनंदवली परिसरातील नवश्या गणपती येथे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. तसेच कार्यकर्त्यांसमवेत आरती देखील केली. सोशल मीडियावर या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच – अजित पवार

नव्या फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल, पाहा फोटो