in

Maharashtra Corona| दिलासादायक! नवीन बाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना आकडेवारीत दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी नवीन रूग्णाइतकेच रुग्ण कोरोनामुक्त होतात. तर कधी नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा दुप्पटीवर पोहोचतो. आज हा दुप्पटीवर गेला आहे तसेच रुग्ण कमी आढळले आहेत. मृतांचा आकडा देखील घटलाय. त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय.

राज्यभरात आज दिवसभरात १३ हजार ५१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६ हजार १७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय ६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pegasus spyware: ”केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पदावरून हकालपट्टी करा”; काँग्रेस आक्रमक

”मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन माझा वाढदिवस साजरा करा”