in ,

Parag Agrawal; ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी दिला पदाचा राजीनामा; पराग अग्रवाल नवे सीईओ

मुंबई : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आयआयटी मुंबईतून पराग अग्रवाल यांचं शिक्षण झाले आहे. जॅक डोर्सी राजीनामा देताना म्हणाले की, कंपनीत सह-संस्थापक ते सीईओ त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष त्यानंतर अंतरिम-सीईओते पुन्हा सीईओ असा 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, आता माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असणार आहे. डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांना ट्विटरची अंतर्गत उद्दिष्टे पूर्ण करावी लागणार आहे.कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला 2023 पर्यंत 315 डेली अॅक्टिव्ह यूजर करण्याचे आणि वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट दिले होते. डोर्सी ट्विटर आणि स्क्वायर या दोन कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहायचे.

इलियट मॅनेजमेंटचे संस्थापक गुंतवणूकदार पॉल सिंगर यांनी म्हटले होते की, जॅक डोर्सी यांनी दोन सार्वजनिक कंपन्यांपैकी एकाचे सीईओ पद सोडले पाहिजे. त्यामुळेच आता डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडले आहे.पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च, याहू रिसर्च आणि एटी अॅन्ड टी लॅबमध्येही काम केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

5 लाखाचे 2 कोटी बनवून देण्याचे आमिष देत दिली झेंडूची फूले; महाराजांचा व्यावसायिकाला गंडा

Mamata Banerjee Mumbai Visit;पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर