in

चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या जाळ्यात

संरक्षित प्राणी असलेल्या चिंकारा हरणाचे शिकार करणाऱ्या दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. महेश जंगलु मने (40) आणि दत्तात्रेय पोपट पवार (42) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले.

वन विभागाच्या माहितीनुसार, वन विभागाचे काही कर्मचारी मंगळवारी रात्री इंदापूर वनपरिक्षेत्रात गस्त घालत होते. यावेळी त्यांना जंगलात बॅटरीचा उजेड दिसून आला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता दुचाकीवर दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत दिसले. यावेळी जंगलात त्यांचा पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दरम्यान त्यांच्या हातात असलेल्या एका गोणीत चिंकारा जातीची हरीण मृतावस्थेत सापडली. या दोघांनी बंदुकीने या हरणाची शिकार केली होती. पुणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महेश जंगलु मने वय 40, सणसर इंदापूर पुणे आणि दत्तात्रेय पोपट पवार वय 42, बोरी, इंदापूर, पुणे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1),(ड), (1) व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16),9,11 व 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी”

पुण्यात फिल्मी स्टाईलने केली कार चोरट्याला अटक