in

रत्नागिरी | पुराच्या पाण्यात पोहणं बेतलं जीवाशी, संगमेश्वरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मागील आठवडाभर जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अशातच पाण्याचा प्रवाह वेगवान असताना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथे आज दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण ( ३२ ) , चेतन सूर्यकांत सागवेकर ( १८ ) दोघेही रा . धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याबरोबर वाहत जाऊन या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली.

या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार ( २७ ) , शुभम शांताराम चव्हाण ( २० ) , राज तुकाराम चव्हाण ( १८ ) , साईल संतोष कांगणे ( १७ ) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आलं नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात ९ हजार नवे कोरोनाबाधित, तर १८० रुग्णांचा मृत्यू