in ,

मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्या, थोडक्यात बचावल्या

भांडुपमधील विलेज रोड परिसरात दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल पडलेल्या पावसामध्ये भांडुप व्हिलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक या महिला मॅनहोल मध्ये पडल्या.


ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह हा कमी होता, नाही तर या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतलं असतं. भांडुपमध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडली होती. उघडे मॅनहोल कधी झाकणार? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन

विदर्भात आठवडाभर मुसळधार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा