in ,

वाशीममध्ये कोरोना मृतदेह माल वाहनातून नेल्याचा प्रकार…

वाशीममधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना बाधित मृतदेह उघड्या माल वाहनातून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

वाशिममधील लेडी हार्डिंग कोविड केअर सेंटरमध्ये आज 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृतदेहाला एका उघड्या माल वाहक वाहनातून नेल्याचा धक्कादायक घटना घडली. या मृतदेहांना रुग्णवाहिकेतून नेणे गरजेचे मात्र तसे न करता माल वाहक वाहनातून नेले होते. तसेच या मृतदेहांना उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पीपीई न घालता या मृतदेहांची उचल केली होती. या घटनेमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेत कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. जर आरोग्य कर्मचारी अशाप्रकारे कुठ्लीही खबरदारी न घेता कोरोना मृतदेहाच्या संपर्कात येत असतील तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Umar Khalid | उमर खालीदला जामीन मंजूर

हाफकिन संस्थादेखील कोवॅक्सीन बनवणार !