in

फडणवीसांसोबतच्या गुप्त बैठकीवर उदय सामंत यांनी सोडलं मौन

माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला. त्यावरून वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या. अखेर या सगळ्या प्रकरणावर उदय सामंत यांनी मौन सोडलं. सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्त भूमिका मांडत निलेश राणे यांना उत्तर दिलं.

“माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, हे कुणी सांगितलंय… ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं. कोकणातील जनतेनं नाकारलं आहे. त्यांनी माझं राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त बैठक झाली. राजकीय खलबतं झाली, अशा प्रकारचं ट्विट करणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. भेट झाली. कुठे झाली. बंद खोलीत झाली, अशा प्रकारच्या बातम्या मी ऐकतो आहे. मी त्यांच्या आरोपांवर कधीही मी बोलत नाही, कारण जनतेचं त्यांची दखल घेतलेली नाही, तर माझ्यासारख्या मंत्र्यानं का घ्यावी?,” असा खोचक सवाल सामंत यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री