in

‘केवळ आश्वासन नाही…दिलेले शब्द पाळतो’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

प्रशांत जगताप | सातारा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्या आहेत. आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्या नगर विकास आघाडीला लगावला आहे.

स्ट्रीट लाईट जोडणी कामाचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीला उदयनराजेंनी टोला लगावला आहे. खासदार उदयनराजे म्हणाले आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो. सातारा विकास आघाडीकडून लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आलो आहोत.आम्ही केवळ आश्वासन देत नसून दिलेले शब्द पाळतो असा टोला आमदार शिवेंद्रराजे यांच्या नगर विकास आघाडीला उदयनराजे यांनी यावेळी लगावला आहेत. दरम्यान येणाऱ्या काळात सातारा पालिका निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 6 संशयित ताब्यात

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; महाराष्ट्राच्या सांगितिक परंपरेच्या आठवणी झाल्या जाग्या