in

हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटतय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप असणार असल्याचं सांगितलं जात होतं. उद्धव ठाकरे यांनीही भाषणाला सुरुवात करताच थेट भाजपवर हल्ला चढवला.

यावेळी अजूनही मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. कारण हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटत आहे, असा चिमटा काढतानाच पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विजयदशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मिरवणुकीत घुसलेल्या कारनं अनेकांना उडवलं; ४ जणांचा मृत्यू, २० जखमी

प्रदुषण थांबलं नाही तर मुंबईसह ५० शहरं पाण्याखाली जाणार!