आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. आज राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली जाणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांबरोबरच यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मास्क न वापरणं यात काय शौर्य?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
त्यामुळे लॉकडाऊन अद्याप टळलेला नाही, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सध्या राज्यभरात दिवसाला एक लाख ८२ हजार कोरोना चाचण्या होत असून यामध्ये ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या असल्याचे सांगितले.
लॉकडाऊन हा घातक आहे. मात्र, आपण कात्रीत सापडलो आहोत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत लॉकडाऊनसंदर्भातील महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्यापासून राज्यात आणखी कडक निर्बंध लावणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
Comments
Loading…