in

MaharashtraLockdown|मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात झाली. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग सुरु आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे.

उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील फोनवरुन चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सहाकार्य करण्याच आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोनवरुन संवाद झाल्याची माहिती मनसेने दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर आपण सर्वांनी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन मनसेने केलं आहे.

तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांना आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी अन्न औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

पालकमंत्री अस्लम शेख LIVE : राज्यात विकेंड लॉकडाउन लागणार