in

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगर | उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मध्ये असलेल्या मोहिनी इमारतीचा स्लॅब दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्बॅल कोसळून तो पहिल्या मजल्यावर आला आणि त्यामुळे येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाला. परिणामी इमारतीमधील रहिवासी इमारतीतच अडकले.

इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने खिडकीतून एक-एक करुन नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जाणून घ्या, आज प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास व्हॉट्सॲप बंद होणार?

रौद्रवतार! घरं जमीनदोस्त, वादळी पावसाने झाडं उन्मळून पडली