in

उंबरमाळी रेल्वे ट्रकवर साचले पाणी; रेल्वे सेवा विस्कळीत

अनिल घोडविंदे | शहापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरु असून उंबरमाळी रेल्वे स्थानकातील ट्रकवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले असून लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन अनेक स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचेही मोठे हाल होत आहे.

उंबरमाळी स्थानकात रेल्वे ट्रकमध्ये 3 फूट पाणी भरले आहे. यामुळे दोन्ही बाजुची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन कसारा व खर्डी,आठगाव, स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation | ओबीसी एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली

साताऱ्यात बेंदूर सण साजरा