in

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवर केंद्रीय गृहसचिव कारवाई करणार – देवेंद्र फडणवीस

पोलीस दलातील बदल्यांच्या कथित रॅकेटसंदर्भात केंद्रीय गृहसचिव कारवाई करतील असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले.

फडणवीस पुढे म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणाचे पुरावे गृह सचिवांना दिले आहेत. तसेच पोलीस बदल्याच्या रॅकेटसंदर्भात पुरावे दिले आहेत. ज्यामध्ये पैसे देऊन पोस्टिंग करण्यात आल्याचे पुरावे आहेत. या सर्व प्रकरणातील पुरावे गृह सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात CBI चौकशीसाठी गृहसचिवांकडे मागणी केली आहे. दरम्यान आता पुराव्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Rate Today | सोने महागले, पाहा सोन्याचे भाव

भिवंडी शहरात गोदामाला भीषण आग