in

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार ते होम क्वॉरंटाईन झाले आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. नितीन गडकरी ट्वीटमध्ये म्हणतात.. कोरोना चाचणी केली असता सौम्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानुसार मी होम क्वॉरंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, गडकरींना 16 सप्टेंबर 2020 रोजी देखील कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतर आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | महाराष्ट्रात 34,424 रुग्णांची नोंद; 34 ओमायक्रॉन बाधित

आज पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन