in ,

Dr.Babasaheb Ambedkar | नखापेक्षा लहान पोर्ट्रेट; महामानवाला अनोखे अभिवादन

देशभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा घरातून अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आल्याने असंख्य अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर घरातूनच अभिवादन केले. तर काहींनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

मुंबईच्या प्रणेश वालावलकर या कलाकाराने नखापेक्षा लहान पेन्सिल पोर्ट्रेट साकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले. या पोर्ट्रेटचा आकार ४ मिमी. असून. त्यात असलेल्या बाबासाहेबांच्या चेहऱ्याचा आकार अवघ्या ३मिमी. चा आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यास प्रणेशला जवळपास २० मिनिटे लागली.

अंगठ्याच्या नखा पेक्षा लहान असलेल्या या पोर्ट्रेटमध्ये बाबासाहेबांच्या चेहऱ्याचा भाव प्रणेशने अचूक रेखाटला आहे. त्याच्या अनोख्या अभिवादनाचे व कलाकृतीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SRH vs RCB Live Score | हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान

इन्स्टाग्रामवर बनला मित्र… नंतर घरात घुसून तरुणीवर अतिप्रसंग