in

आधी चक्कर..आणि त्यानंतर मृत्यू; नाशकात रहस्यमय आजाराने ९ जणांचा मृत्यू

नाशकात एकीकडे कोरोनचा उद्रेक सुरू असून दुसरीकरडे एका रहस्यमय आजाराने नाशिककरांची चिंता वाढवली आहे. शहरात एकाच दिवशी चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात नऊ जणांच्या मृत्यूच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

14 एप्रिल रोजी एका दिवसात चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. बहुतांश हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही, अशी परिस्थिती असल्याने इतर आजारांचे रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. अशावेळी रुग्णांना उपचार मिळत नाही त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे.

या आजारासंदर्भात अद्याप डॉक्टरांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, कोरोनाच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडल्याचे चित्र आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”राज्यात ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार”…अखेर मंत्र्यांचीच ग्वाही

Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिक आर्यन आऊट