गेले काही दिवस रखरखीत उन्हाने तप्त झालेल्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत गुरुवारी सकाळी पावसाचा हलका शिडकावा झाला. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात आकाश ढगाळ असेल.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्यता आहे. राज्यावर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनक बातमी आहे .
Comments
Loading…