in

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. मात्र असं असलं तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

धमकीमध्ये मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असं या धमकीत म्हटलं आहे.

योगी यांना झेड प्लस दर्जाची व्हिआयपी सुरक्षा देण्यात आलीय. २०१७ पासून त्यांना ही सुरक्षा देण्यात आली असून ते जिथे जातात तिथे त्यांच्या आजूबाजूला २५ ते २८ कमांडोजचे संरक्षण कडं असतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला घरचा आहेर; म्हणाले…

‘लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही’