in ,

बहुचर्चित City of Dreams 2 चा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित असलेला तसेच सर्वाधिक गाजलेल्या वेब सीरिजपैकी City of Dreams 2 ही एक वेबसिरिज. या वेबसिरिजच्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून ३० जुलैला याचे सगळे भाग प्रदर्शित होणार आहेत. राजकारणात बापाविरुद्ध उभ्या असलेल्या मुलीची ही कहाणी आहे. या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असणार आहेत तर अभिनेता सिध्दार्थ चांदेकर देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक मराठी कलाकार या सिरिजमध्ये झळकणार आहेत.

सिटी ऑफ ड्रिम्स ही हॉटस्टारच्या गाजलेल्या वेब सिरीजपैकी एक मानली जाते, एकामागुनएक येणारे ट्विस्ट, बहारदार अभिनय, आणि उत्कृष पॉलिटिकल ड्रामा यामुळे पहिला सिझन भरपूर गाजला होता. त्यांनतर आता या सिरिजचा दुसरा भाग ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये मराठमोळ्या प्रिया बापटचे अॅंग्रीलेडीचं पात्र प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
या सीझनमध्ये मुलगी आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. एखादा राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो अन सत्तेच्या लालसेपुढे सर्व नाती व्यर्थ असतात. हे या सीरिजमध्ये दाखवलं जाणार आहे. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तांबडी नदी ओवरफ्लो; गावात शिरले पाणी

जीवाची बाजी लावणाऱ्या ‘या’ वायरमॅनचं होतंय सर्वत्र कौतुक