in ,

महिलांच्या मूलभूत हक्कांवरून संयुक्त राष्ट्रानं तालिबानला सुनावलं

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यापासून महिलांवर बरेच अन्यायकारक निर्बंध लावले आहेत. शाळा सुरू केल्या पण त्यात शिक्षक महिला आणि विद्यार्थिनींना प्रवेश नाही, सरकारी कार्यालये चालू केली पण महिला कर्मचाऱ्यांना इमारतीतच प्रवेश नाही, विद्यापीठांमध्यल्या स्त्री-पुरुषांच्या आसनांमध्ये पडदा, महिला व्यवहार मंत्रालयाची (Ministry of Women’s Affairs) जागा वाईस अॅण्ड व्हरच्यु मंत्रालयाने (Ministry of Vice and Virtue) घेतली आहे. ही यादी संपता संपणार नाही.

सगळ्या देशांनी याबाबत तालिबानचा विरोध केला असला तरी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ‘डे ऑफ द गर्ल चाईल्ड’ च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल अॅन्टोनीयो गुटेरेस यांनी अफगाणिस्तानातल्या गंभीर स्थितीवर भाष्य केले आहे. “महिला आणि मुलींचे कष्ट जपलेच पाहिजेत आणि त्यांचे हक्क कायम ठेवले पाहिजेत. त्यांच्याशिवाय अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि समाज सावरणार नाही,” अस ते म्हणाले आहेत.


अमेरिका आणि तालिबान्यांमधल्या पहिल्या चर्चेवरही गुटेरेस यांनी टिप्पणी केली आहे, या भेटीत महिलांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता. “तालिबान्यांनी अफगाण महिला आणि मुलींना दिलेली आश्वासने मोडली जात आहेत हे पाहून मी आतून तुटलो आहे. मी तालिबानला महिलांना आणि मुलींना दिलेली आश्वासने आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यानुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन करतो,” असंही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘आज तुमचे हे चांगले खेळले’; ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांच्या सायलीला शुभेच्छा

शाहरुखच्या समर्थनात अभिनेत्री स्वरा भास्करने ‘ही’ कविता शेअर करत दर्शवला पाठिंबा !